मुंबई : आज (२९ मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हिंदू सणांच्या परवानगीवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा खोचक सवालही शेलार यांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना आशिष शेलार म्हणाले की,‘आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांसंदर्भात अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. जेव्हा जेव्हा हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात याव्यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भाजप सहभागी होईल,’ असेही शेलार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
- IPL 2022 : “मला रिटेन करण्याबाबत RCBनं…”, राजस्थान संघात गेल्यानंतर चहलचा धक्कादायक खुलासा!
- “मुख्यमंत्र्यांना काही अधिकार आणि इज्जत आहे की नाही अशोकराव?”, भातखळकरांचा सवाल
- IPL 2022 : “गौतम दादानं मला…”, गुजरातविरुद्धच्या शानदार खेळीनंतर ‘बेबी एबी’ आयुषनं मानले गंभीरचे आभार!
- विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सलमान खान म्हणाला…


