Share

Raosaheb Danve | “ज्यांच्यासोबत 40 आमदार आहेत त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा”, रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 40 आमदारांसह बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर त्यांचा दावा केला. त्यामुळे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, अशे दोन गट पडले आहेत. आता शिवसेना कोणाची या प्रश्नानंतर शिवतीर्थवर होणारा दसरा मेळावा कोणाचा असा प्रश्न समोर येत आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रीयाः

ज्यांच्याबरोबर 40 आमदार आहेत त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा, असं दानवेंनी म्हटलं आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक खासदार आहे त्यांचा शिवाजी पार्कवर अधिकार आहे, असंही गणित दानवेंनी सांगितलं आहे.

अमित शाहांमुळे भाजप कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ मिळेल. उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. इतकंच नाही तर त्यांनी जनतेलाही धोका दिला. अमित शाह यांनी कोणताही शब्द दिला नव्हता. निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं शिवसेनेनं मतं मागितली. नंतर आम्हाला धोका दिला, असं म्हणत दानवेंनी मनातील खंत बोलून दाखवली.

2 वर्ष मुख्यमंत्री राहिले पण साधं मंत्रालयमध्येही ते गेले नाहीत आणि आता डायलॅागबाजी करत आहेत. गवताला भाले फुटतील, केसाला भाले फुटतील, काय ती डायलॉगबाजी, असं दानवे म्हणालेत.

दरम्यान, शिवसेना कोणाची याबाबत भाष्य करताना पक्षाचे चिन्ह असल्याशिवाय निवडणूका होणार नाहीत. सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल, असं दानवेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!