🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं आहे. मात्र औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रीपद विस्तारामध्ये मंत्रीपद न मिळाल्याने ते कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळेच शिरसाट हे स्नेहभोजणासाठी जाणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आपण नाराज नसून मुंबईला निघालो असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी वर्षावर केलं स्नेभोजनाचं आयोजनः
आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना शिंदेंनी वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी बोलावलं आहे. या स्नेहभोजनाला शिरसाट हजर राहणार नव्हते. मात्र, शिरसाट यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
संजय शिरसाट निघाले मुंबईलाः
मतदारसंघात काम असल्याने मी आज मुंबईला जाऊ शकत नव्हतो. मात्र, प्रसार प्रसारमाध्यमांनी मी जाणार नाही अशा बातम्या दिल्या. त्यामुळे आता मी मुंबईला जाणार आहे. कारण, या बातम्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होईल. म्हणून, मी जात आहे. आज कसलीही बैठक नाही, फक्त गणपती दर्शन आणि भोजन, असा कार्यक्रम आहे, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मागील महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने आपली नाराजगी संजय सिरसाट यांनी बोलून दाखवली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Tanaji Sawant | शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची – तानाजी सावंत
- Raj Thackeray | राज ठाकरे ‘वर्षा’वर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चांना पुन्हा उधाण
- Navneet Rana | ही तर फक्त सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है – नवनीत राणा
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे घेणार राज्यापालांची भेट, नवीन 12 आमदारांची यादी तयार
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं मिशन विदर्भ देणार उद्धव ठाकरेंना टक्कर?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
