Share

वीज कनेक्शन तोडणाऱ्यांनी खुर्ची लिलावाची आठवण ठेवा : संभाजी पाटील 

Published On: 

लातूर : कोव्हिड – १९ तसेच लॉकडाऊन च्या कालावधीत सामान्य शेतकरी व्यापारी नागरिकांना अवाजवी वीजबील देत सक्तीने वसुली केल्या जात आहे. तर ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवा. अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्ची लिलावाची आठवण करुन द्यावी लागेल असा इशारा माजी कामगार मंत्री तथा आमदार संभाजी पाटील यांनी महावितरण ला दिला आहे.

कोराना तसेच लॉक डाऊनमुळे ५ महिने व्यापार तसेच बाजारपेठा देखील बंद होत्या. त्यामुळे बाजारपेठेमध्येही शुकशुकाट होता. एखाद्या दुकानदाराने दुकान उघडले तर दंडात्मक कारवाइ होत होत होत्या. या परिस्थित दुकान बंद असून देखील ७० ते ८० हजार रुपयांचे बीले देखील आली आहेत. विशेष म्हणजे झोपडी असलेल्या घरात देखील १५ ते २५ हजार रुपयापर्यंत महावितरणने बीले दिली आहेत. हा अन्याय कदापी खपवून घेणार नसल्याचेही आमदार निलंगेकर यांनी निलंगा येथे केले. निलंग्यात काही वसाहतींमध्ये १२ – १२ तास भारनियमन केले जात आहे. हा अन्याय तर आहेच.

परिपत्रकाचा विनाकारण बाऊ करुन विजेचे कनेक्शन तोडले आहेत. अगोदरच अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या भागामध्ये विहिरीला पाणी आहे, तर वीजेचा पत्ता नाही. या मुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कुण्या शेतकऱ्यांचे वीजेचे कनेक्शन तोडू नये. तर गाठ माझ्याशी असल्याचा सज्जड दम महावितरणला संभाजी पाटील निलंगेकर यांनी भरला आहे.

सध्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने २७ व २८ दरम्यान जनता कफ्यू पाळण्याचे आवाहन केले असून प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन देखील निलंगेकर यांन केले आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ग्रामीण भागात देखील काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

महत्वाच्या बातम्या  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!