Share

आरोग्य विभागात गुणवत्तेलाच प्राधान्य ; आरोग्यमंत्र्यांनी दिला परीक्षार्थींनी धीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी ८ हजार ५०० पदांची भरती ही पहिल्या टप्प्यात होणार आहे. यासाठी घेतली जाणारी परीक्षा ही उद्या म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

या परीक्षेपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे परीक्षार्थींना आवाहन केलंय. परीक्षार्थींनी धीर देण्याचा आणि गुणवत्तेलाच प्राधान्य असल्याचा विश्वास देण्याचं काम टोपे यांनी केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांनी एका पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांन केलंय.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने जाहिरात काढून परीक्षेची भरतीप्रक्रिया राबवली. त्यानुसार, उद्या रविवार २८ फेब्रुवारी रोजी राज्यभरात परीक्षा घेण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार उमेदवारांनी दोन पर्यायांची निवड केली. उमेदवारांना परीक्षांचे प्रवेशपत्र २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यात दोन्ही परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी होणार असून दोन्ही पदांच्या परीक्षेच्या वेळा, उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक सारखे देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी परीक्षा देणे शक्य नसल्याने गोंधळाने निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!