🕒 1 min read
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. त्यावरुन राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उद्गार काढणाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर आज नाशिक येथे बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं आवाहन केले आहे.
यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे. ‘इतके पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राउतच सांगू शकतात. सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
इतके पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राउतच सांगू शकतात. सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये. https://t.co/D3ZLnS3z0w
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 24, 2021
दरम्यान, आजच्या ‘सामना’तील रोखठोक लेखातून ता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सावरकरांबद्दल भूमिका मांडताना त्यांचा ‘माफीवीर’ असा उल्लेख करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगातून सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागितली, हे चुकीचे असल्याचं मत संजय राऊतांनी या सदरात मांडलं आहे. ‘गुलाम हिंदुस्थानचे नायक असलेले सावरकर स्वतंत्र हिंदुस्थानचे खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट होता. त्या कटाच्या कारवाया आजही सुरूच आहेत. सावरकरांनी माफी मागितली आणि सुटले असं म्हणणं संपूर्ण चुकीचं आहे. सावरकर शेवटपर्यंत ब्रिटिशांना खेळवत होते. हे ब्रिटिशांनीही ओळखलं होतं’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
सावरकरांना परकीयांसोबतच स्वकीयांनी देखील त्रासच दिल्याची भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. ‘सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकीयांनी छळले आणि आजही स्वकीय त्यांचा छळ करत आहेत. सावरकरांचं क्रांतिकार्य, त्यांचा त्याग विसरूल काही लोक त्यांना माफी मागून सुटलेला वीर म्हणत आहेत. हा एक कट आहे, सावरकरांच्या माफीबद्दलच्या दंतकथा अर्ध्याअधुऱ्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चरोटाही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफिवीर म्हणून करत आहेत’, अशा शब्दांत त्यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले शरद पवार, परंतु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

