मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. परंतु निवडणुकीत शरद पवार यांच्या सहित १६ उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही. यामुळे निवडणूक कोणत्या नियमाखाली घेतली जात आहे, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदासाठी आज निवडणूक होत आहे.
आज होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर इथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ही साखर कारखान्याची, बँकांची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरू आहे, ही दंडेलशाही आहे या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.शिंदे यांच्या या आरोपावर प्रत्यत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उमेदवार विद्या चव्हाण म्हणाल्या की,’पवारांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते हे काही जणांना माहीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बाबत करण्यात आलेल्या आरोपाला उत्तर दिले जाईल.’
दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे आहेत. दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


