मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये प्रचंड घोळ सुरु आहे. दोन पदासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार असून सकाळचा पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे. अशावेळी दोन्ही पेपर द्यायचे कसे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे. काही पदासाठी परीक्षा फी भरण्यात आली नसताना देखील त्यांना हॉलतिकीट प्राप्त झाले आहे. यावर आमदार तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘राज्यात आरोग्य भरती परीक्षेचा बाजार..! अंधाधूंद नियोजनशून्य कारभाराचां पुन्हा एकदा सामान्य विद्यार्थ्यी बळी. गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवयाला बरं येत सरकारला. यांना फक्त वसुलीचे सांगा पेपरच नको ..!!!’ असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
राज्यात आरोग्य भरती परीक्षेचा बाजार..!
अंधाधूंद नियोजनशून्य कारभाराचां पुन्हा एकदा सामान्य विद्यार्थ्यी बळी.गांजा फुकणार्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवयाला बरं येत सरकारला.
यांना फक्त वसुलीचे सांगा पेपरच नको ..!!!
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 24, 2021
राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदावर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षांसाठी सरकारचे नियोजन वारंवार बिघडत असल्याने विद्यार्थ्यांची मात्र कसरत होत आहे. २ पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एकाच शहरात परीक्षा देता येणे शक्य आहे. तसे नियोजन न करता सकाळी एक पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे अशी अवस्था अनेक विद्यार्थ्यांची झाली आहे.
एक पेपर पुण्यात तर दुसरा पेपर सांगलीत, एक पेपर साताऱ्यात तर दुसरा पेपर नाशिकला, एक पेपर ठाणे तर दुसरा वासिमला असे नियोजन केल्यामुळे परीक्षेला हजर कसे रहावे असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. यामुळे अनेकांना एकाच पदासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने याबाबत नवीन नियोजन करावे अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

