🕒 1 min read
मुंबई : केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
‘समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांशी बोलणार. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे. या लोकांनी हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. कुठे तरी या घटनेची दखल घेऊन त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. याबाबत मी मागणी करणार आहे. उद्या रात्री मुंबईत आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं.
प्रभाकर साळी याचा व्हिडीओ हे एक षडयंत्रं असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना काहीही बोलू द्या. साळी स्वत:च सांगतो तो गोस्वीचा बॉडीगार्ड आहे. मी गोसावी आणि भानुशालीचा व्हिडीओ काढल्यानंतर एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांनी पीसी घेतली होती.
ज्ञानेश्वर सिंग यांनी नऊ लोकांची नावे घेतली होती. त्यातील हा पहिल्या नंबरचा पंच आहे. पंच यांनीच आणले. पंच यांनीच ठरवले. तो गोसावीची बॉडी गार्ड आहे. त्याने गौप्यस्फोट केल्यानंतर हे षडयंत्रं सांगत आहेत. आमचं म्हणणं आहे चौकशी होऊ द्या. त्यात सर्व बाहेर येईल. हेच नाही इतर लोकांकडूनही यांनी पैसे घेतले आहेत. तेही हळूहळू बाहेर येतील. बोलू शकतील, असं मलिकांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले शरद पवार, परंतु…
- सोमय्यांचा नांदेड दौरा; सचिन सावंत म्हणाले, ‘मी स्वागताला तयार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
