मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ९ साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. ‘मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती’, असा आरोप गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल याने केला आहे. गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला. त्यानंतर इंडिया टूडेशी बोलतांना त्याने समीर यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर आता समीर यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत समीर म्हणाले की, ‘मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर योग्य ते उत्तर देईल’, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, प्रभाकरने म्हंटले आहे की,’तो गोसावीचा बॉडीगार्ड असून ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या,’ असेही त्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

