Share

कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्रातील खासगी शिकवणी वर्ग पुन्हा सुरू करण्याची लवकरच परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. याबाबत मुख्य सचिवांशी व मुख्यमंत्र्यांशीही वैयक्तिकरित्या बोलू असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. तथापि शिकवणी वर्गांना अद्यापही परवानगी नाही. ते बंद केल्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मोठा धक्का बसला आहे. याबाबत ‘सरकार जगाओ वाणिज्य बचाओ’ संघर्ष समितीचे निमंत्रक व चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान, काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध राज्याचे पोलीस दल सक्षमपणे कारवाई करीत आहे. मात्र, एनसीबीने कारवाई करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. जणू काही महाराष्ट्रातच अमली पदार्थ विक्री होते, असा देखावा उभा केला जात असल्याची टीकाही गृहमंत्र्यांनी केली.

ईडी, आयकर हे अलीकडे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले असून, तशीच कारवाई होत आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांना लक्ष करून ईडी, आयकरचे धाडसत्र राबविले जात आहे. परंतु, गत दोन वर्षांत एकाही भाजपच्या नेत्याकडे ईडी, आयकरची नोटीस किंवा धाडसत्र का पडले नाही, असा सवाल गृहमंत्र्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!