मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याचा भारतातील वेग हा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. यातच हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे इथे होणाऱ्या गर्दीने कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाणही मोठे आहे. अनेक साधू-संत कोरोना बाधित झाले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे डेहराडून येथे निधन झाले. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना संकटाचा विचार करता कुंभ मेळा केवळ प्रतिकात्मक ठेवावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मात्र आता कुंभमेळ्यांतून पुन्हा त्यांच्या राज्यांत परतणारे भाविक कोरोनाचा संसर्ग पसरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखिल या मुद्द्यावरून टीका केल्याचं पाहायला मिळालं. आता परतणाऱ्यांसंदर्भात अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. ‘गेल्यावर्षी २७ मुस्लीम बांधव मरकजहून परतल्यानंतर कोरोनाचा प्रसार झाला होता. त्याचप्रकारे आता कुंभमेळ्यातून परतणारे भाविक इतरांना कोरोनाचा प्रसाद वाटत फिरतील’ असे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
दरम्यान, ‘कुंभमेळा बंद व्हायला हवा पण आता उशीर झाला आहे. आता संसंर्ग रोखायचा असेल तर, परतणारे भाविक ज्या राज्यांत जातील तिथं त्यांना स्वखर्चानं क्वारंटाईन करायला लावावं असंही पेडणेकर यांनी म्हटलंय. तसेच या सर्वांची कोरोना चाचणी करून खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच मुंबईतही अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा विचार आहे. प्रत्येक एसटी डेपोमध्ये परणाऱ्यांची तिकिटे पाहून कुंभमेळ्यातून आलेले असल्यास त्यांना क्वारंटाईन करणार आहे’ असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतोय, सोळा दिवसात वाढले तब्बल ‘इतके’ रुग्ण!
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले : पियुष गोयल
- शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू , दुध उत्पादाकांच्या पाठीशी : मंत्री केदार
- दोस्ताना 2 मधून कार्तिक आऊट ; सोशल मीडियावर कारणने केलं अनफॉलो
- नवाब मलिक यांनी पुरावे द्यावे अन्यथा राजीनामा द्यावा : प्रवीण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

