औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा धोका वाढत चालला आहे. प्रतिदिन ग्रामीण भागात देखील पाचशेहून अधिक रुग्ण वाढत चालले आहेत. काल दिवसभरात ग्रामीण भागात ७५० कोरोनाच्या रुग्णांची भर पडली. १ एप्रिल ते काल रात्री आलेल्या अहवालानुसार या सोळा दिवसांत ग्रामीण भागात ९ हजार ६८७ कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढत चालली आहे.
काल रात्री शहरातील ८०० तर ग्रामीण भागात ४८१ असे एकूण १२८१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८७९९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात शहरात ६३८ तर ग्रामीण भागात ७५० असे एकूण १३८८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०५९७१ झाली आहे. तर २७ रुग्णाचा मृत्यू झाल्याने आजपर्यंत एकूण २१०२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या एकूण १५८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यात आतापर्यंत शहरातच पाचशेहून अधिक रुग्ण वाढत असल्याचे समोर आले होते. तर ग्रामीण भागात देखील आता कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच दुसरीकडे ग्रामीण भागात १ तारखेला ५५९ रुग्ण आढळून आले होते. तर २ ला ६२२ तर ३ ला ४४२ रुग्ण आढळून आले होते.
त्यात ४ एप्रिल ला ६२१ कोरोनाचे रुग्णांची भर पडली आहे. तर ५ तारखेला ५४८ रुग्ण आढळून आले. तसेच ६ तारखेला ५५३ तर ७ ला ४०८ रुग्णांची भर पडली. याशिवाय ८ ला ४८४ तर ९ तारखेला हा आकडा ५०० वर जाऊन पोहचला त्यात १० तारखेला एकाच दिवशी ८७७ रुग्णांची भर पडली आणि चिंतेत आणखी भर पडली. ११ एप्रिल ला ५६० रुग्ण आढळून आले. १२ ला यात ग्रामीण भागात ७१५ रुग्णांची भर पडली. १३ ला ५३९ तर १४ ला ९४७ , १५ तारखेला ५६२ आणि काल दिवसभरात ७५० रुग्णांची भर पडल्याने ग्रामीण भागात केवळ सोळा दिवसात तब्बल ९ हजार ६८७ रुग्ण वाढले असल्याने चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात काळाबाजारी चव्हाट्यावर; रेमडेसिविरचे दोन इंजेक्शन दहा हजार ८०० रुपयांमध्ये विकले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले : पियुष गोयल
- शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू , दुध उत्पादाकांच्या पाठीशी : मंत्री केदार
- दोस्ताना 2 मधून कार्तिक आऊट ; सोशल मीडियावर कारणने केलं अनफॉलो
- नवाब मलिक यांनी पुरावे द्यावे अन्यथा राजीनामा द्यावा : प्रवीण दरेकर


