Share

शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू , दुध उत्पादाकांच्या पाठीशी : मंत्री केदार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील कष्टकरी दुग्ध उत्पादकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. मागच्या वर्षाच्या मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे अधिक दुधाचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी शासनाने दुग्ध संकलन सहकार क्षेत्रातूनच केले आहे. तर सहकार क्षेत्राला यातून मदतच झाली, असल्याचे प्रतिपादन दुग्ध विकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार औरंगाबाद येथील दौऱ्या दरम्यान केले.

गांधेली येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धशाळेची पाहणी केली. या वेळी केदार बोलत होते. यावेळी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष उपस्थित होती. मंत्री केदार म्हणाले, की बाहेर राज्यातील काही दुध संस्थांनी राज्यातील दुधाची बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. यावर सर्व लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्याचा काळ कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे खुप मोठा संकट काळ आहे. या काळात सर्वांनी सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत केदार यांनी या वेळी व्यक्त केले.

सुरूवातीला केदार यांनी उत्पादक संघाच्या दुग्ध शाळेतील दुधापासून निर्मित विविध पदार्थांची पाहणी करून उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. यामध्ये दुग्ध शाळेतील कंदी पेढा, लस्सी, तूप, आइसक्रीम, प्रयोगशाळा, पॅकिंग आदी विभागांनाही भेटी दिल्या. या वेळी दुग्धशाळेतील स्वच्छता, नीटनेटकेपणा याबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक केदार यांनी केले. यावेळी आमदार बागडे यांनी संपूर्ण दुग्ध शाळेतील प्रकियेबाबत केदार यांना पुर्ण माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या        

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!