मुंबई : देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांवर आता भाजपचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ‘पुरावे द्यावे अन्यथा राजीनामा द्या’ असा इशारा दिला आहे.
‘सध्या महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. यामध्ये सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. आणि मग हे अपयश लपवण्यासाठी काही मंत्री केंद्र सरकारवर असे बिन-बुडाचे आरोप करतात. जर का नवाब मलिक यांच्याकडे याबाबतचे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर आणावेत अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागून त्यांचा राजीनामा द्यावा’. असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक: शहरासाठी महत्त्वपूर्ण ‘या’ योजनेला बसला फटका!
- हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला – हसन मुश्रीफ
- ‘मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ३ वेळा फोन केला पण ते सध्या बंगालाच्या प्रचारात व्यस्त आहेत’
- कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार – पेडणेकर
- नांदेड जिल्ह्यातील १३ तालुक्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

