नवी दिल्ली : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Saddened to see @OfficeOfUT’s gimmicks on oxygen. GoI, with all stakeholders, is ensuring maximum oxygen production in India. We are currently producing 110% of Oxygen generating capacity and diverting all available Oxygen from industrial use to medical use.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
‘ऑक्सिजनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले. भारत सरकार सर्व भागधारकांसह, भारतात जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन सुनिश्चित करत आहे. आम्ही सध्या 110% ऑक्सिजन उत्पादन क्षमता तयार करीत आहोत आणि उपलब्ध सर्व ऑक्सिजन औद्योगिक वापरापासून वैद्यकीय वापराकडे वळवित आहोत. देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी केंद्र सरकार दररोज राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे. कालच पंतप्रधानांनी आपल्या आढावा बैठकीत सांगितले की या संकटात केंद्र व राज्यांनी सहकार्याने काम केलं पाहिजे.’ अशा आशयाचे ट्वीट गोयल यांनी केले आहे.
Maharashtra has so far received the highest quantity of Oxygen in India.
Centre is in daily touch with State Governments to assess their needs & help them in best possible manner.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
तसेच ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून क्षुल्लक राजकारणाचे खेळ पाहून आश्चर्यचकित आणि दु: खी झालो. त्यांनी राजकारणाचे रोजचे डोस देणं थांबवून जबाबदारी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सध्या अपंग व भ्रष्ट सरकारचा त्रास सहन करीत आहे आणि केंद्र जनतेसाठी चांगले प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील लोक ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ कर्तव्यदक्षपणे अनुसरण करीत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझं राज्य, माझी जबाबदारी’ या भावनेने कर्तव्य बजावावे.’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी पुरावे द्यावे अन्यथा राजीनामा द्यावा : प्रवीण दरेकर
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

