Share

मुंब्रा अग्नितांडव : दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू झाला

Published On: 

मुंब्रा – मुंब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील 6 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला.बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

मुंब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील 6 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यास्मीन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47) हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठामपा अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आहे.

दरम्यान, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची रुग्णालयाची पाहणी केली आहे.मृतांच्या कुटुंबियांना सरकार आणि ठाणे मनपा ५ लाखांची मदत करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागलेली नाही. आग लागल्यानंतर सर्वत्र धूर पसरला. त्यानंतर मागच्या खिडक्या तोडून रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. रुग्णांना बाजूच्या बिलाल रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. रुग्णांना तातडीनं शिफ्ट करण्याची आवश्यकता होती. मात्र रुग्णालयातून इतरत्र नेताना ४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे अतिशय दुर्दैवी असं म्हणत सर्व रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!