Share

मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीची किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी

Published On: 

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. हे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनास्थळी भेट देण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या पोहचले होते. यावेळी त्यांना यांना अनपेक्षित विरोधाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक शानु पठाण किरीट सोमय्या यांना बघताच आक्रमक झाले. त्यामुळे प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला.

कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे ही काही नवीन बाब नाही. त्यानुसार किरीट सोमय्याही आज सकाळी प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयात पोहोचले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानु पठाण यांनी ‘किरीट सोमय्या वापस जावो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी शानु पठाण यांना अडवले. ‘आम्ही लोकांना वाचवण्याचे काम करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी राजकारण करु नये,’ असे शानु पठाण यांनी किरीट सोमय्यांना सुनावले. त्यानंतर किरीट सोमय्या काहीवेळातच पाहणी करुन घटनास्थळावरून निघून गेले.

दरम्यान, मुंब्रा येथील प्राईम हॉस्पिटलला आज पहाटे ३ च्या सुमारास आग लागली नेमके आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!