🕒 1 min read
बीड : रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झासा आहे. याचा फायदा काळाबाजार करणाऱ्यांनी घेतला आहे. बीडमध्ये होणाऱ्या काळाबाजार रोखण्याची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच एका पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते कार्यालयातून रेमडेसिवीर इंजेक्शन देत असल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावावर हे इंजेक्शन प्रशासनाकडून ताब्यात घेतले जात आहे. या वेळी चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांच्या सह्या इंजेक्शनच्या मागणीसाठी घेतल्या जात आहेत असे सुद्धा पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हटल्याचे वृत्त सकाळ, एबीपी माझा या वृत्तसमुहांनी प्रकाशित केले आहे.
#COVID19 संदर्भात @CMOMaharashtra ला पत्र लिहून सूचना केल्या. pic.twitter.com/XO0LH619EC
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 27, 2021
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपण १ मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेणार आहात. या लसीकरण कार्यक्रमात वयाची अट नसावी कारण प्रत्येकाला स्वतःचे जीवन सुरक्षित करण्याचा अधिकार आहे. या लसीकरण कार्यक्रमात माझ्यापरीने माझ्या कांही विनम्र सुचना आहेत. लसीकरण कार्यक्रमाची माहिती गावागावामध्ये देण्यासाठी सरकारी यंत्रणे एवढी दुसरी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसते त्यामुळे या यंत्रणेचा प्रभावी उपयोग करावा. आरोग्य विभागाच्या समवेत ग्रामविकास खात्याच्या ग्रामपंचायत, महसुल विभागाच्या तलाठी आणि नगरविकास विभागाच्या वॉर्ड कार्यालयापासुन ते आयुक्त कार्यालयापर्यंत सर्व यंत्रणा या कार्यक्रमात सज्ज कराव्यात.
लसीकरणाचे केंद्र हे जास्तीत जास्त उपलब्ध करून दयावेत जेणेकरून गर्दी कमीत कमी होईल. नाहीतर एकाच केंद्रावर जास्त गर्दी होऊन संसर्ग वाढू शकतो. खासगी डॉक्टर्सना सुध्दा लसीकरणा संदर्भात अधिकार आणि पुरवठा केला तर अधिक सोयीचे होईल. लसीकरणासाठी ज्यांचा दुसरा डोस आहे आणि जे वयस्कर आहेत, ते आणि पहिल्या डोसचे नागरीक एकत्र केले तर गोंधळ उडेल त्यामुळे पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे.
जे नागरीक कोविड पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांना लक्षणे नाहीत त्या नागरीकांना गावागावामध्ये आयसोलेशनच्या संदर्भात निर्णय घेणे जास्त सोयीचे ठरेल. बऱ्याच सामाजिक संस्था, राजकीय नेते आपापल्या परीने आयसोलेशन सेंटर, रुग्णांच्या खाण्या पिण्याची सोय, औषधांची व्यवस्था करत आहेत पण सरकारी यंत्रणा गावागावात पोहोचलेली व प्रशिक्षित असते त्यामुळे सरकारी यंत्रणेने हा निर्णय घेणे संयुक्तिक ठरेल.
मागच्या वेळी मजूरांना आपण ज्यावेळी गावी पोहोचवले होते त्यावेळी गावातच त्यांना आयसोलेशन केलं होतं. तसं गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी किंवा शाळा ज्या आता बंद आहेत त्या ठिकाणी जर आयसोलेशन केंद्र केलं तर घरातील एखादा व्यक्ती पॉझिटीव्ह असला तरी बाकीच्यांना संसर्ग होण्यापासून वाचवता येईल. गावात आयसोलेशन सेंटर झाले तर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सच्या माध्यमातून त्यांना मॉनिटर करणे शक्य होईल. त्यांची जेवणाची जरी सोय झाली तरी या आयसोलेशन सेंटरमुळे गावागावात वाढत असलेला प्रादुर्भाव कमी होईल. फिरत्या कोरोना चाचणीची व्यवस्था आणि चेकिंग व्हावी. तरी याबाबत आपण आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीची किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
- नांदेड जिल्ह्यातील ६६ गावे कोरोनामुक्त
- २५ चेंडुत ५३ धावांची झुंजार खेळी करणारा हेटमायर पराभवानंतर भावूक; फोटो व्हायरल
- ब्रेक द चेन! नांदेड जिल्ह्यात ३ लाख जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
- अग्नितांडव थांबेना! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, ४ रुग्णांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
