Share

‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका

Published On: 

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भाजपने याचे खापर महाविकास आघाडी सरकावर फोडले आहे. तसेच शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवले आहे. आरक्षणाची बाजू कोर्टात योग्य पद्धतीने न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलेय.

‘मराठा आरक्षणाबाबत आता लोकांना वस्तुस्थिती समजली आहे. भाजप खोट्याचे खरे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आधीचा कायदा, आयोग फडणवीसांनीच नेमला होता. तो रद्द झाल्याने आता फडणवीसच लोकांना मूर्ख बनवण्याचे काम आहेत. विनायक मेटे यांचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी आहे. त्यांनी केलेल्या टीकेकडे मी लक्ष देत नाही. भाजपने सांगितले म्हणून ते बोलत आहेत’ अशी टीका चव्हाण यांनी केली. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चव्हाणांनी औरंगाबादेतील पत्रकारांशी संवाद साधत काँग्रेसची भूमिका मांडली.

ते म्हणाले, पदोन्नतीमध्ये आरक्षण ही काँग्रेसची भूमिका आहे. याबाबत उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय महत्त्वाचेच असतात. मात्र याच्यापलीकडेही सरकारला जाता येते का? कायदेशीर मार्ग कसा काढता येईल याचा निर्णय आघाडी सरकारच्या वतीने घेतला जाईल, असेही चव्हाण म्हणाले.

एका दिवसात राजकारण घडत नाही
छत्रपती संभाजीराजे व प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबाबत चव्हाण म्हणाले, ‘संभाजीराजे सर्वांशी चर्चा करून चांगला प्रयत्न करत आहेत. मात्र प्रकाश आंबेडकरांशी भेटीनंतर एका दिवसात काही राजकारण घडेल असे वाटत नाही. आंबेडकर यांच्यासोबत आमच्याही अगोदर भेटी झाल्या आहेतच याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

भाजपमध्ये गडकरींचे पंख छाटण्याचे काम सुरू
केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींचे काम चांगले आहे. मी त्यांचे अभिनंदनही केले आहे. त्यांचा पक्ष व आमच्यात मतभेद असले तरी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गडकरींचा सर्वांशी चांगला संवाद आहे. मात्र त्यांच्याच पक्षात गडकरींचे पंख छाटण्याचे काम सुरू आहेत. त्यांचे अधिकार कमी केले जात आहेत. त्यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. त्यामुळे गडकरी ‘राइट पर्सन इन राँग पार्टी’ असेच म्हणावे लागेल, असा टाेला अशाेक चव्हाण यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!