नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपलेले आहे. या सरकारच्या बेफिकिरीमुळेच ओबीसींना आरक्षण गमवावे लागले. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारेच ओबीसींना आरक्षण दिले. त्यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली नाही. हे दुटप्पी सरकार आहे. ओबीसींच्या मतांवर हे सरकार सत्तेत आले. मात्र ओबीसींवरच अन्याय करत आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नाशी केंद्राचा संबंध येत नाही. हा राज्याचा विषय आहे. राज्य सरकार खोटे बोलत आहेत. सरकारने तातडीने डाटा तयार करावा. एका महिन्यात आयोग स्थापन करून तीन महिन्यांत डाटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही टीका केली. अमोल मिटकरी हे काव्य करण्यात माहीर आहेत, पण त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलावे एवढी त्यांची उंची नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘भाजप दुतोंडी असून आरक्षणविरोधात त्यांची एक वेगळी विचारधारा आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

