🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून १९७० पासून औरंगाबाद शहरात संस्थान गणपती राजाबाजार येथून मानाची मिरवणूक निघते. ह्या मिरवणुकीत शहरातील असंख्य गाड्या, सजीव देखावे, ईतिहासकालीन युद्ध कौशल्य, तलवारबाजी, दांडपट्टा यांचे प्रदर्शन करीत शिवप्रेमी मोठया संख्येने सहभागी होत असतात. हळूहळू शहर मोठे झाले, त्यामुळे त्या-त्या विभागातील शिवप्रेमींना सोयीचे व्हावे याकरिता विभागनिहाय मिरवुणका सुरू करण्यात आल्या होत्या.
मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे वर्षभरापासून कुणीही कोणताही सण उत्सव साजरा करू शकले नाहीत. त्यामुळे ही जयंती उत्साहात साजरी करायचीच अशी सर्व शिवप्रेमींची भावना व तयारी होती. त्या अनुषंगाने तयारी देखील करण्यात आली होती. परंतु मागील चार दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट परत वाढत होत आहे. त्यामुळे शासन सतर्क झाले असून संभाव्य धोका टाळावा म्हणुन मिरवणुका, पोवाडे, व्याख्यान, वाहन रॅली असे काहीही न काढता साध्या पध्दतीने अभिवादन करून शिवजयंती साजरी करावी असे शासनाने आदेश काढले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची बैठक घेतली.
राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता शासनाच्या आदेशाचे आणि पोलिस आयुक्त यांनी केलेल्या विनंतीला मान देत संस्थान गणपती, राजाबाजार येथून निघणारी मानाची मिरवणूक रद्द केल्याचे औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने कळवले आहे. तसेच सर्व शिवप्रेमींनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करावी आणि सकाळी ९ वाजता क्रांती चौक येथे अभिवादानासाठी यावे असे आवाहन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कसोटीगिरी’ साठी नावाजलेल्या पुजाराचं तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन !
- प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू


