Share

प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा आज पार पडत आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आता पर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला असून शाहरुख खान नामक खेळाडूला अभिनेत्री प्रीती झिंटाच्या ‘पंजाब किंग्ज’ या संघाने खरेदी केलं आहे. शाहरुख खान म्हणल्यावर बॉलिवूडचा किंग खानच डोळ्यासमोर येतो. शाहरुख खानचा स्वतःचा ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघ देखील आहे. आता, प्रीती झिंटाने तामिळनाडू कडून रणजी खेळणाऱ्या शाहरुख खानला आपल्या संघासाठी खरेदी केलं आहे.

या खेळाडूच नाव हे अभिनेता शाहरुख खानच्या नावावरूनच ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ‘पंजाब किंग्ज’ने तब्बल ५.२५ कोटी रुपयांमध्ये त्याला संघात समाविष्ट केलं आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० मालिकेत शाहरुखने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याची कामगिरी सर्वच संघानी हेरली होती. यामुळेच २० लाख बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला तब्बल ५.२५ कोटींची बोली लावून पंजाबने खरेदी केलं आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिस साठी १६.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात लिलावामध्ये सर्वात मोठी बोली लावलेली ही किंमत आहे. १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात जमा केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!