🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा आज पार पडत आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आता पर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला असून भल्या भल्या संघांच्या भेदक गोलंदाजांसमोर पाय रोवून खिंड लढवणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. विशेष म्हणजे तब्बल ७ वर्षांच्या खंडानंतर पुजारा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. लिलावामध्ये ५० लाख रुपये मोजून चेन्नई सुपर किंग्जने पुजाराला संघात घेतलं आहे. ‘कसोटीगिरी’ साठी सद्याच्या भारतीय संघात अढळ स्थान निर्माण केलेला पुजारा टी-२० सारख्या आक्रमक खेळ प्रकारामध्ये कशी कामगिरी करणार याची उत्सुकता क्रिकेट रसिकांच्या मनात निर्माण होत आहे.
.@ChennaiIPL bring @cheteshwar1 on board for INR 50 Lac. @Vivo_India #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिस साठी १६.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात लिलावामध्ये सर्वात मोठी बोली लावलेली ही किंमत आहे. १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात जमा केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय, एखाद्या घडामोडीमुळे सरकार पडण्याची त्यांना भीती आहे’
- प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालता मग…वशाटोत्सव आणि साहित्य सम्मेलनही रद्द करा – संभाजी ब्रिगेड
- ‘अमिताभ बच्चन यांचा मेमरी लॉस झाला आहे का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
