Share

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आजपर्यंतचे सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण!

Published On: 

दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण ९२ मिनिट चालले. त्यांचे हे भाषण त्यांनी आजपर्यंत त्यांनी केलेले सर्वात छोटे भाषण आहे. मागच्या वर्षी त्यांचे भाषण १ तास ५० मिनिट चालले होते. तर २०२० मध्ये त्या पावणेतीन तास बोलल्या होत्या.

तसेच २०२० चे त्यांचे भाषण आजपर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्याने दिलेले सर्वात मोठे भाषण होते. पण त्या भाषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती आणि शेवटची दोन पाने त्यांची वाचली नव्हती. मोदी २.० मध्ये वित्तमंत्री झाल्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आपले पहिले भाषण केले. तेव्हा त्या २ तास १७ मिनिट बोलल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जसवंत सिंहाचा विक्रम मोडीत काढला होता.

यावेळेस त्यांनी अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने सादर केला. यावेळी अर्थसंकल्पाचे वाचन टँबलेटवर केले आहे. भाषणात हिंदी, उर्दू, तमिळ कवितांचा वापर करणे हे सीतारामन यांचे वैशिष्ट्य आहे. यावेळेस त्यांनी राज्यधर्माशी संबधित महाभारतातील श्लोक वापरला आहे. साधारणपणे अर्थसंकल्पीय भाषण पावणेदोन ते दोन तास चालते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!