मुंबई : मागील वर्षी झालेल्या टी ट्वेन्टी वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने खराब कामगिरी केली होती. या कामगिरी विषयी मोठी टीका हि भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यावर जास्त झाली होती. त्याच्या संघात निवडी विषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थतीत केले गेले होते. मात्र आयपीएल मध्ये नवीन संघ अहमदाबादचा कर्णधार म्हणून घोषणा झाल्यानंतर हार्दिकने आता सगळ्या घटनेवर भाष्य केले आहे.
बोरिया मजुमदार यांच्यासोबत बोलताना हार्दिकने लावल्या गेलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला ” स्पर्धेतील संघाच्या खराब कामगिरीचे संपूर्ण खापर आपल्यावर फोडले जात आहे. ती ट्वेन्टी विश्वचषकातील परिस्थिती बघता, मला असे वाटले की सर्व काही माझ्यावर लादले गेले आहे. माझी संघात फलंदाज म्हणून निवड झाली होती. मी पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ते जमले नाही. दुसऱ्या सामन्यातही मी गोलंदाजी केली, तीही गरज नसताना” हार्दिक पंड्याने सांगितले की, या स्पर्धेसाठी त्याची संघात फलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती आणि काही सामन्यांमध्ये त्याला गोलंदाजी करायची नव्हती.
What happened in WC 2021 and looking ahead at WC 2022 | @hardikpandya7 gets candid on #BWB @R1SEWorldwide pic.twitter.com/UHXMtZDIgw
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) January 31, 2022
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, ” मला अष्टपैलू म्हणून खेळायचे आहे. काही वाईट घडले की नाही हे मला माहीत नाही पण माझी तयारी अष्टपैलू म्हणून खेळण्याची आहे. मला बरं वाटतंय, धीर जाणवतोय आणि शेवटी काय होतं ते काळच सांगेल? मला देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे आणि यामुळे मला खरोखर आनंद आणि अभिमान वाटेल ‘ हार्दिक पंड्या आता आयपीएल मध्ये अहमदाबाद संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वात तो पुन्हा गोलंदाजीकडे वळणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प’; यशोमती ठाकूर यांची टीका
- राज्यपालांची नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात हजेरी; भुजबळांनी केले स्वागत
- घटस्फोट घेतल्यानंतर ही आमिर खान किरण रावसोबत! व्हिडिओ व्हायरल
- औरंगाबादेत लस न घेणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा कडक नियमावली; नो रेशन, नो उपचार!
- शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला-खा. नवनित राणा


