Share

“राजाला जर कल्याण साधायचं असेल…”, अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामण यांनी दिला महाभारताचा संदर्भ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. (Union Budget 2022) या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या. महिला सक्षमीकरण, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. दरम्यान देशातल्या कर आकारणीबद्दल बोलताना सीतारामन यांनी महाभारतातल्या एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे.

निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, ‘महाभारतातल्या शांतिपर्व अध्यायात कर आकारणीबद्दल लिहिले आहे. राजाला जर कल्याण साधायचं असेल, तर धर्माने सांगितल्याप्रमाणे जो कर आहे तो वसूल करायला हवा.’ दरम्यान आजच्या अर्थसंकल्पात कर रचनेत सलग सहाव्या वर्षी कोणताही बदल न झाल्याने नोकरदार वर्गाच्या पदरी निराशा पडली आहे.

सहकार, कॉर्पोरेट क्षेत्राला मात्र सीतारामन यांनी काहीसा दिलासा दिला आहे. या दोन्ही क्षेत्रांना अगोदर १८ टक्के कर भरावा लागायचा मात्र आता या दोन्ही क्षेत्रांना १५ टक्के कर भरावा लागणार आहे. (Corporate and co-operative sector will have to pay 15 per cent tax) याशिवाय सरचार्जदेखील १२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच इन्कम बेस १ कोटीवरून १० कोटी करण्यात आला आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर आता १५ टक्के कर द्यावा लागणार आहे.

तसेच क्रिप्टोकरन्सी संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात २०२२-२३ मध्ये आरबीआय स्वत:चे डिजिटल चलन आणेल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या घोषणेचा मोठा प्रभाव शेअर मार्केटवर दिसून आला. मुंबई शेअर मार्केट १ हजार अंकांनी वधारला असून मार्केटने ५९ हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!