🕒 1 min read
ठाणे : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण, रेल्वे, क्रीडा, वाहतुक आदी क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः शेती आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प. बंगाल, तामिळनाडू, आसाम या राज्यावरही योजनांची खैरात केली आहे. शेतकऱ्यांसाठी दीडपट ‘एमएसपी’ची तरदूत केली आहे. एकंदरीत सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांना खुश केले आहे.अर्थसंकल्प जाहीर करायाल सुरुवात झाल्यापासून त्याचे पडसाद उमटायला लागले आहेत. विरोधक यावरून सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागले आहे. ‘यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढला आहे’ अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ…
देश विकायला काढलायं… #India_For_Sale
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 1, 2021
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच दिलं नाही. आर्थिक कंबरडं मोडलं तर देशाचा तुर्की व्हायला नको. अर्थसंकल्प कुणासाठी सादर झाला हे मला समजलेलं नाही. LIC बाबत झालेल्या निर्णयाचे गरिबांचा इथे गुंतवलेला पैसा जाणार नाही याची हमी सरकार घेणार आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला केला.
महत्वाच्या बातम्या
- हा अर्थसंकल्प काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी- बाळासाहेब थोरात
- पत्नीला नांदवत नसल्याने शिक्षकाला मारले
- नाफेडच्या तूर खरेदीला आजपासून प्रारंभ
- देशात महाराष्ट्र आहे पण बजेटमध्ये दिसत नाही- छगन भुजबळ
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
