Share

#Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला

Published On: 

नवी दिल्ली : “केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते, पण महाराष्ट्राला काय दिलं, त्यांच्या खिशात काय आहे?. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव” असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केलीय. “महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली, पण महाराष्ट्रावर कायम अन्याय झालाय. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे सरकार पाहत नाहीत. सध्या, आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं.” असेही ते म्हणाले.

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२१-२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले होते.

आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते, असे म्हणत राऊत यांनी सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? पेट्रोलचे भाव आत्ताच १०० रुपये लिटरपर्यंतो पोहोचले आहेत. आता, १ हजार रुपये लीटर करून कायमचं मारायचं आहे का? तसेच, बंगाल, तामिळनाडू, केरळसाठी विशेष तरतूद यावर बोलताना हा अर्थसंकल्प देशाचा आहे की राजकीय पक्षासाठीच्या निधीवाटपाचा, राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधीवाटप सुरू आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!