मुंबई:- केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे.
दरम्यान, देशात महाराष्ट्र आहे पण बजेटमध्ये दिसत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे. नाशिक मेट्रोला जाहीर केलेल्या निधीचं स्वागत पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्राचा अर्थसंकल्प कुणासाठी आहे हे समजत नाही. भेदभाव करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी नवी योजना यामध्ये नाही. नोकरदारांना कोणताही दिलासा नाही, अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? – जयंत पाटील
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक; पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

