🕒 1 min read
बीड : पत्नीला नांदवत नाही या कारणाने पाच जणांनी एका शिक्षकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना बीड तालुक्यातील बोरफडी घाटात घडली. याप्रकरणी पाच जणांवर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बोरफडी येथील शिक्षकाचे आठ वर्षांपूर्वी वडगाव गुंधा येथील तरुणीसोबत लग्न झाले होते. सध्या या दांपत्याचे घटस्फोटासाठीचे प्रकरण बीड न्यायालयात सुरू आहे. औरंगाबाद येथील प्राथमिक शाळेत नोकरीस असणारा हा शिक्षक सध्या लॉकडाऊनमुळे गावाकडे आलेला आहे. शुक्रवारी दुपारी हा शिक्षक बीडमधून २ नातेवाइकांसह दुचाकीवरून गावाकडे निघाला होता.
दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बोरफडी घाट चढून वर गेल्यावर त्यांना दोन दुचाकींवरून आलेल्या संतोष दिगंबर दिवटे (रा. काजळा, ता. गेवराई), राहुल कुंडलिक बुधनर (रा. खामगाव, ता. बीड), अमोल लक्ष्मण पारे (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), दीपक लक्ष्मण भुसारे (रा. गोकुळवाडी, जि. जालना) व एक अनोळखी अशा ५ जणांनी त्यांना अडवले. बायकोला व्यवस्थित नांदवत नाहीस असे म्हणत त्यांनी शिक्षकाला खाली खेचले आणि दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देत निघून गेले.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? – जयंत पाटील
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक; पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत

