Share

हा अर्थसंकल्प काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी- बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाच्या अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. खास करुन या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारतवर जोर देण्यात आला आहे. पण सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. देश विकू देणार नाही असं मोदी म्हणायचे पण आता त्यांनीच देश विकायला काढला आहे. काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

ज्या संस्था सक्षम आहे त्या संपवण्याचं काम सुरू आहे. काँग्रेसने गेल्या अनेक वर्षात या संस्था सर्वसामान्य लोकांसाठी भक्कम केल्या होत्या त्या संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पेट्रोल डिझेलच्या कच्या मालाच्या किमती कमी होत असताना आपल्याकडे मात्र दर वाढताना पाहायला मिळतात. पैसे कसे उभे करायचे आणि कुठे खर्च करायचे हे केंद्राला समजत नाही. मीच काय सर्व देशही नाराज आहे, असा दावा थोरात यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!