Share

यंदा कापसाचे क्षेत्र २० टक्क्यांनी कमी तर सोयाबीन, तुरीची लागवड अधिक, कृषी तज्ज्ञांचे मत!

Published On: 

औरंगाबाद :  दोन वर्षांपासून मका पिकावर होत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव, घटलेला बाजारभाव आणि तसेच लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटू शकतात. रब्बी हंगामात मक्याची सरासरीपेक्षा जवळपास अडीचशे टक्क्यांनी अधिक लागवड झाली होती. कापसाचेही क्षेत्र २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांचा कल पाहता सोयाबीन, तुरीची लागवड अधिक क्षेत्रावर होऊ शकते.

औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना व बीड हे तीन जिल्हे येत असून यामध्ये रब्बीचे एकूण ६ लाख ६४ हजार ३६ एवढय़ा सरासरी हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ५ लाख ४१ हजार ६८२ म्हणजे ८१.५७ टक्के रब्बीचा पेरा झालेला आहे. त्यातील ९७.५३ हेक्टरवर मक्याची पेरणी झालेली होती. औरंगाबाद जिल्ह्य़ात लागवडीची टक्केवारी तब्बल २४७.६८ एवढी होती

रोहिणी नक्षत्रातील पंधरा दिवसांपैकी आठ ते दहा दिवस बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र, यातील बहुतांश शेतकरी कापसाची लागवड करत असल्याचे चित्र असले तरी गतवर्षी लांबलेला पाऊस आणि त्याचा कापसालाही बसलेला फटका पाहता यंदाही कापूस मोठय़ा क्षेत्रावर लावण्याची मनस्थिती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा मका पिकाकडेही शेतकऱ्यांचा लागवडीचा फारसा ओढा दिसत नाही. गत दोन वर्षांपासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे मका लागवड करण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही. गतवर्षी मका पिकाला बाजारात दरही हजार ते अकराशे रुपये क्विंटलपर्यंतच मिळाला. याशिवाय करोनामुळे विदेशात जाणारा मका निर्यात होऊ शकला नाही. स्टार्च करणाऱ्या कंपन्यांकडूनही करोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी नव्हती. परिणामी दर गडगडले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!