🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात उतरणार आहे. कर्णधार विराट कोहलीने रविवारी, सामन्याच्या एक दिवस आधी, जाहीर केले होते की या हंगामा नंतर तो संघाचा कर्णधारपद सोडेल. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याआधी, जाणून घ्या कशी असेल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची प्लेइंग इलेव्हन.
सलामीला कोहली आणि पडिक्कल, कर्णधार कोहली युवा देवदत्त पडिक्कलसह डावाची सुरुवात करताना दिसतील. मधल्या फळीत, या हंगामात, कोहलीचा संघ ग्लेन मॅक्सवेलच्या आगमनाने खूप मजबूत दिसत आहे. रजत पाटीदारसोबत फलंदाजी करणारा एबी डिव्हिलियर्स देखील संघाची ताकद आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीच्या पहिल्या सराव सामन्यात त्याने शतकही केले आहे, त्याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारीही असेल.
चहलला फिरकीमध्ये हरसंगाची साथ मिळेल
या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात, संघाने श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वनिंदू हसरंगाचा समावेश केला आहे. युझवेंद्र चहल सोबत, त्याला देखील यूएईची स्थिती लक्षात घेता प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाजीमध्ये सिराज, सैनी आणि हर्षल
मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि हर्षल पटेल हे गोलंदाजी सांभाळतील. त्याचबरोबर काइले जैमिसनचा संघात समावेश असल्याने संघ अजूनच मजबूत दिसत आहे.
RCB संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (wk), वनिंदू हसरंगा, नवदीप सैनी, काइले जैमिसन, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या:
- आजचा सामना रंगणार RCB विरुद्ध KKR
- ‘जेव्हा तुमच्याकडे माही भाई असतो तेव्हा…’, धमाकेदार खेळीचे ऋतुराजने कर्णधाराला दिले श्रेय
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
- ‘अपेक्षेपेक्षा चांगल्या स्कोअरवर नेले’, माहीने ‘या’ दोन शिलेदारांना दिले विजयाचे श्रेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
