Share

‘हे अनपेक्षित संकट ; अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल’

Published On: 

मुंबई : कोकणात आलेली पूर परिस्थितीने सगळेच हादरले आहेत. कोकणात ढगफुटीमुळे पावसाने थैमान घातलं आहे. रायगडच्या तळीये गावात आज दरड कोसळून ३६ लोकांचा जीव गेला आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं वक्तव्य स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी डोंगर उतारावर आणि पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मी गेल्या चार पाच दिवसांपासून घेत आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीला काही मर्यादा राहिलेली नाही कारण अतिवृष्टीच्या पुढची वृष्टी होत आहे. अनपेक्षित असं हे संकट आहे. दरडी कोसळताहेत, पुराचे पाणी वाढतंय, नद्या फुगताहेत आणि या संकटाला आपण सामोरे जात आहोत.

या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांचा फोन आला होता. सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यानुसार आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड आणि एनडीआरएफच्या टीम मदत कार्यात उतरली आहे. आपापल्या परीने मदत आणि बचावकार्य करत आहेत. काही ठिकाणी नद्यांना आलेला पूर आणि धरणांचे पाणी सोडावे लागत असल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे,’ असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हे सगळं करत असताना कोरोनाचं सुद्धा संकट टळलेलं नाही आणि याचीही कल्पना आपल्याला आहे. हाच तो परिसर आहे जिथे कोरोनाचं संकट आपल्याला चिंताजनक वाटतंय. अशा वेळेला पहिल्या प्रथम जिवीत हानी होऊ न देणं हे महत्त्वाचं काम आहे त्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!