मुंबई : गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यात भारताने जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. या सामन्यानंतर भारतीय संघाला २० दिवसाची सुटी देण्यात आली. मात्र ही सुटी संपण्यापुर्वी भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे.
सुटीदरम्यान सलामीवीर शुभमन गीलला दुखापत झाल्याने तो इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला. यानंतर डरहम येथे काउंटी इलेव्हन संघासोबत सराव सामन्यादरम्यान इंग्लंड दौऱ्यातील राखीव खेळाडू आवेश खानच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तोही इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार याच सराव सामन्यात भारताचा युवा अष्टपैलु खेळाडू वॉशिंग्टन सुंदरलाही दुखापत झाल्याने तोही इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे.
सराव सामन्यात आवेश खान आणि वॉशिग्टंन सुंदर दोघेही जखमी झाले होते. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होण्यास ३ आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागु शकतो त्यामुळे तोही इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. यामुळे २४ सदस्य असलेला भारतीय संघाचे इंग्लंड दौऱ्यावर आता केवळ २१ सदस्य राहीले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
- पक्षातील नेत्याच्या मुलीच्या विनयभंगा प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करा ; AISF ची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

