🕒 1 min read
पुणे – पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री 25 हजार क्यूसेकने पाणी सोडल्यानंतर शहरातील डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला होता. सकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या जलपर्णीमुळे मोठा कचरा निर्माण झालाय, सध्या भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.
दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 227 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 11.68 टक्यांनी वाढ झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 66.75 टक्के झाला आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे.
दरम्यान, लोणावळ्यात गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. त्यामुळे चोवीस तासात 322 मिमी पावसाची नोंद झाली. तर गेल्या 48 तासात 712 मिमी पाऊस कोसळला. परिणामी लोणावळा शहर आणि परिसरातुन वाहणारी इंद्रायणी नदी पात्र सोडून वाहत होती. काही ठिकाणी सखल भागात पाणी ही साचले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- दरेकर-महाजन भरपावसात पूरग्रस्त भागात दाखल, पूरग्रस्तांना दिला धीर
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
