🕒 1 min read
मुक्रमाबाद – देगलूर – उदगीर – रेणापूर हा राज्य मार्ग आता राष्ट्रीय मार्ग म्हणून रूपांतरित करण्यात आला आहे. या मार्गावर असलेल्या देगलूर – मुक्रमाबाद- उदगीर रास्ता मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता अरुंद असून त्यात जागो – जागी, खड्डेच – खड्डे असल्याने येथून ये – जा करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मुखेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष झालाच आरोप शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील यांनी नुकताच केला आहे.
मुक्रमाबाद ही मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन धारकांची वर्दळ या रस्त्यावर असते. देगलूर – उदगीर ही जवळची तालुके असल्याने व्यवसायिक, नोकरदार, इतर प्रवाशी यांचा प्रवास नित्याचा असतो. त्यातच पावसाळ्याचे दिवस त्यामुळे रत्यावरील पडलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने जीव मुठीत धरून कसरतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक महिन्यापासून हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने जाणून बुजून तरी या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तूर्तास तरी या रस्त्याला परिसरातील नागरिक पूर्णतः वैतागले आहेत.
देगलूर – उदगीर – रेणापूर हा राज्य मार्ग आता राष्ट्रीय मार्ग केवळ नावापुरताच राहिला आहे. देगलूर – मुक्रमाबद – उदगीर या मार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून अरुंद रास्ता असल्याने चार चाकी एकेरी वाहन ये – जा करण्यास मोठी अडचण होत आहे. मुक्रमाबाद, ईटग्याळ (प. मु.), मारजवाडी, परतपुर, रावी आदी गावाजवळील रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पल्ल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असून वाहूकीचा वेग मंदावत आहे.
याच मार्गावर मारजवाडी, इटग्याळ, लखमापुर फाटा येथील पुलावरुन नेहमी पुराचे पाणी जात असल्याने प्रवासी वाहतूक खोळबंली जात आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन दिड वर्षाहुन काळ लोटला आहे. सरकार मध्ये बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण यांनी मुखेड तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुर यांनी केला. तालुक्यातील असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने लक्ष देण्याची गरज सर्वसामान्य नागरिकांसह आघाडीतील नेते बोलून दाखवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

