Share

‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत. गावातील अनेक सखल भागात घरांमध्ये तसच बाजारपेठेत पाणी शिरलं असून, नदी पात्रा जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत.

पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन याचा फटका कोकणवासियांना बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोकणाला अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे कोकणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारने याविषयी तातडीने कुठलेही गंभीर पाऊल उचलले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

‘अतिवृष्टीमुळे कोकणात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना दरेकर म्हणाले, गेल्या १० दिवसांपासून मुंबईची तुंबई झाली. दरडी कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडले. तसेच कोकणातही हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असूनही राज्य सरकारने कोकणात कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडली असून कोकणवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.’ असे देखील ते म्हणाले आहेत.

कोकणातील नद्यांना पूर आला असून, कोकणवासीयांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. कोकणातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला कपड्यांपासून जेवणापर्यंत व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. या संकटच्या परिस्थितीत राज्य सरकारने युद्धपातळीवर नियोजन करण्याची गरज आहे.

कोकणात एनडीआरएफची राखीव टीम ठेवण्यात यावी जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास घाई होणार नाही. एक टीम महाड, चिपळूण, रत्नागिरी येथे ठेवण्यात यावी. मुख्य शहारामध्ये जर तासाभराच्या अंतरावर एनडीआरएफची टीम असेल तर उपाययोजना तातडीने करता येईल, अशी सूचना दरेकर यांनी सरकारला केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!