Share

Raj Thackeray | “ही तात्पुरती आर्थिक अ‍ॅडजेस्टमेंट” ; राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले. गेल्या दोन तीन महिन्यापासून राज्यात जे सुरु आहे ते महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. महाराष्ट्रात असं कधीही नव्हतं. मतदाराने 2019ला मतदान केलं. त्याला कळतही नसेल आपण मतदान कुणाला केलं? कोण कुणात मिसळला आणि कोण कुणातून बाहेर आला काहीच कळत नाही. हे जर खरं राजकारण वाटत असेल तर हे राजकारण नाही. ही तात्पुरती आर्थिक अ‍ॅडजेस्टमेंट, सत्तेची अ‍ॅडजेस्टमेंट आहे, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी युती तोडली कारण-

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. भाजपसोबतची युती तोडण्याबाबत ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी युती तोडली कारण केवळ अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळू शकले. मी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरेंनी ठरवले होते की ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यालाच मुख्यमंत्री करायचे. आधीच ठरलेल्या गोष्टी तुम्ही कशा बदलू शकता? निवडणूक प्रचारादरम्यान खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते, तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही.”

नुपूर शर्माला राज ठाकरे यांनी दिला पाठिंबा-

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य करून वादात सापडलेल्या नुपूर शर्माला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, सर्वांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. मी त्यांना पाठिंबा देतो. नुपूर शर्मा जे बोलल्या होत्या, झाकीर नाईकनेही तेच सांगितले होते. नाईक यांनी माफी मागावी अशी कोणीही मागणी केलेली नव्हती.

उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील-

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल, अशी घोषणा केली. मात्र या घोषणेनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. तसेच राज्यातील स्पर्धापरीक्षेची तयारी करणारे तरुण देखील आता आक्रमक झाले आहेत. तसेच या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. उद्या कोजागिरी, मंगळागौर खेळाचा दर्जा देतील. उद्या लग्नात वरमाला गळ्यात पडली की खेळाचा दर्जा मागतील, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या निर्णयाचा आज समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!