Share

Raj Thackeray। उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील; राज ठाकरेंनी घेतला शिंदे सरकारचा समाचार!

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray। मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल, अशी घोषणा केली. मात्र या घोषणेनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. तसेच राज्यातील स्पर्धापरीक्षेची तयारी करणारे तरुण देखील आता आक्रमक झाले आहेत. तसेच या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. उद्या कोजागिरी, मंगळागौर खेळाचा दर्जा देतील. उद्या लग्नात वरमाला गळ्यात पडली की खेळाचा दर्जा मागतील, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या निर्णयाचा आज समाचार घेतला आहे. ते मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते.

दरम्यान, याआधी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विरोधकांना प्रत्युत्तर देताना म्हणाले होते कि, “कुणी मागणी केल्यास देशी खेळ विटी दांडू आणि मंगळागौरीलाही राज्य सरकारकडून खेळाचा दर्जा दिला जाऊ शकतो,” असे ते म्हणाले. गोविंदांना शासकीय नोकरीत वेगळे 5 टक्के आरक्षण दिलेले नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. शासकीय नोकरीत विविध प्रकारच्या खेळाडूंना 5 टक्के आरक्षण आहे. यामध्ये किमान 22 ते 25 खेळ आहेत. त्यामध्ये फक्त आणखी एक खेळ म्हणजेच दहीहंडीचा समावेश केला आहे. म्हणजेच गोविंदांना याच कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयावरुन एवढा वाद होण्याचे कारण काय, हे समजत नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिल होत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!