🕒 1 min read
मुंबई : पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांबाबत बोलत असताना मंत्रालयासमोर एका शेतकरी ने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अधिवेशनात पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे भाष्य करत होते. यावेळेस ही घटना घडली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भाष्यावेळी शेतकऱ्याने घेतलं पेटवूनः
सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तांदुळवाडी गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी दुपारी आंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हीसकवून घेतली.
शेतकरी जखमीः
या संपुर्ण घटनेमध्ये देशमुख जखमी झाले असून त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बजाज भवन जवळ फुटपाथ वरील झाडाखाली आडोशाला उषा मेहता चौक या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख या शेतकऱ्यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे. मात्र, त्यांना दवाखान्यात नेलं असून यामध्ये त्यांचा हात भाजला गेला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- MNS | ‘हलाल मीट’ विरोधात मनसे आक्रमक!, टेरर फंडिंग असल्याचा आरोप!
- Assembly Session 2022 | छत्रपतींच्या विचारांना छेद देण्याचे काम शिंदे सरकारने केले ; अंबादास दानवेंचा प्रहार
- Raj Thackrey | नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राज ठाकरे यांचं समर्थन, म्हणाले…
- Raj Thackrey | “अन् बाळासाहेब मला मिठीत घेऊन म्हणाले…”, राज ठाकरेंनी मातोश्रीवरील ‘तो’ प्रसंग सांगितला
- Thackeray vs Shivsena | शिवसेना कुणाची? प्रकरण ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाडे, २५ ऑगस्टला होणार फैसला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
