Share

MNS | ‘हलाल मीट’ विरोधात मनसे आक्रमक!, टेरर फंडिंग असल्याचा आरोप!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतात हलाल मीट आणि झटका मीटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने हलाल मीटला विरोध केला आहे. तसेच याचे संबंध टेरर फंडिंगशी जोडले आहे. त्यामुळे हिंदूंच्या उपजीविकेवर आणि महसुलावर मोठा परिणाम झाल्याचे मनसेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात काही काळापूर्वी हलाल मीटच्या उत्पादनांवरून वाद झाला होता.

मनसेने हलाल मांसाविरोधात मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर दहशतवादाला वित्तपुरवठा करणारी ही सर्वात मोठी यंत्रणा असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार , “हलाल मांसाचे महत्त्व इतके वाढले आहे की झटका मांसाच्या व्यवसायावर वाईट परिणाम होत आहे.” “ही यंत्रणा शाकाहारी आहार आणि मांसाहार करणाऱ्यांनाही लक्ष्य करत आहे,” असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे खुले पत्र-

महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेने याबाबत खुले पत्र लिहिले आहे. “एक प्रकारे, आपण आपल्या स्वखर्चाने दहशतवादाला आर्थिक मदत करत आहोत. हे फक्त महाराष्ट्रातचं थांबवायचे नाही. तर देशात थांबवायचे आहे. आम्हाला लोकांची चळवळ उभारण्याची गरज आहे आणि लोकांना या कार्यात सामील होण्याचे आवाहन करावे लागेल. यापूर्वी मनसेने मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

हलाल मीट आणि झटका मीटमधील फरक-

हलाल आणि झटका या दोन्ही प्रकारात प्राणी मारला जातो, फक्त त्याला मारण्याची पद्धत वेगळी आहे. झटक्याच्या मांसामध्ये, प्राण्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले जातात जेणेकरून ते एका फटक्यात प्राण गमावतात.

त्याच वेळी, हलाल मांसासाठी, प्राण्याची मान आणि श्वासोच्छवासाची रक्तवाहिनी कापली जाते, ज्यानंतर ते थोड्या वेळाने मरतात. हलाल व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे मांस इस्लाममध्ये निषिद्ध आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!