🕒 1 min read
गोवा : भाजप नेत्या तसेच बिग बॉस फेम आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचं गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सोनाली फोगटच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचं कुटुंबीय भूतानहून गोव्याला रवाना झाले. 2016 मध्ये सोनालीचा पती संजय फोगट देखील फार्म हाऊसमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सोनाली 22 ते 25 पर्यंत तिच्या गोवा दौऱ्यावर होती. बंद पडलेल्या चिनी टिकटॉक अॅपवर सोनाली फोगट भारतात खूप लोकप्रिय झाली होती.
सोनाली फोगाट हिचा गोवामध्ये मृत्यूः
सोनाली फोगट हिने भाजपच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली होती. हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघातून तिने कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. आगामी आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचा दावाही तिने केला होता. काही दिवसांपूर्वी तिने कुलदीप बिश्नोई यांचीही भेट घेतली होती. कुलदीप बिश्नोई यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
बिग बॉस-१४ या रिअॅलिटी शोची होती स्पर्धक –
2019 च्या हरियाणा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध असलेली सोनाली फोगट प्रचंड चर्चेत होती. ती बिग बॉस-१४ या रिअॅलिटी शोची स्पर्धक होती. बिग बॉस-14 शो दरम्यान सोनालीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले होते. या रिअॅलिटी शोमध्ये तिने सांगितले की, पती संजय फोगट यांच्या निधनानंतर तिच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आली होता. मात्र, यावेळी त्या व्यक्तीचा उल्लेख न करता सोनालीने काही वैयक्तिक कारणांमुळे हे नातं मधेच संपवलं आल्याचं तिने सांगितलं.
टिकटॉक स्टार आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितले जात आहे. मात्र, स्थानिक प्रशासन याला दुजोरा देण्यात व्यस्त आहे. गोव्यात सोमवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. सोनाली भाजप नेत्यांसोबत गोव्याच्या दौऱ्यावर गेली होती.
महत्वाच्या बातम्याः
- Farmer’s Suicide | अधिवेशनात एकनाथ शिंदे शेतकऱ्यांवर बोलत होते अन् मंत्रालयाबाहेर शेतकरी ने पेटवून घेतलं
- MNS | ‘हलाल मीट’ विरोधात मनसे आक्रमक!, टेरर फंडिंग असल्याचा आरोप!
- Assembly Session 2022 | छत्रपतींच्या विचारांना छेद देण्याचे काम शिंदे सरकारने केले ; अंबादास दानवेंचा प्रहार
- Raj Thackrey | नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राज ठाकरे यांचं समर्थन, म्हणाले…
- Raj Thackrey | “अन् बाळासाहेब मला मिठीत घेऊन म्हणाले…”, राज ठाकरेंनी मातोश्रीवरील ‘तो’ प्रसंग सांगितला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
