Share

‘या’ चुकामुळे झाला भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेत तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताचा ८ गडी राखुन पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या जोस बटलरने ८३ धावांची धडाकेबाज खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत ५ चौकार आणि ४ षटकार लगावले.

या सामन्यात भारताने अनेक चुका केल्या ज्यामुळे भारताचा पराभव झाला. त्यात प्रामुख्याने काही चुका महत्वाच्या होत्या पहिली चुक संघ निवडण्यात केली. मागील दोन सामन्यातील अपयशी ठरलेल्या के. एल. राहुलला पुन्हा संधी देणे भारताला महागात पडले. याचा परिणाम सलामीवीर रोहित शर्माच्या आगमनामुळे मागील सामन्यातील हिरो इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. आणि कर्णधार कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजी करायला आला. यामुळे संघाचा फलंदाजी क्रम बिघडला.

दुसरी चुक म्हणजे आघाडीच्या फलंदाजाचे अपयश. के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तर भारताच्या फलंदाजीदरम्यान कोहलीच्या चुकीमुळे रिषभ पंत धावबाद झाल्याने भारताच्या धावगतीला ब्रेक बसला. दुसऱ्या डावात केलेली खराब गोलंदाजी आणि सुमार क्षेत्ररक्षणात सोडलेले झेल यामुळे भारताचा पराभव निश्चित झाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!