🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या काही निर्णयामुळे तो टिकेचे लक्ष्य बनला आहे. सुरुवातीच्या सामन्यात त्याने रोहित शर्माला संघात स्थान न दिल्यामुळे रोहितचे चाहते नाराज झाले होते. तर सतत अपयशी होणाऱ्या लोकेश राहुलला वारंवार संधी दिल्याने त्याच्यावर टिकेची झोड उठली आहे.
विराटने इंग्लंडच्या विरुद्ध टी-२० सामन्याच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माला विश्रांती दिली होती. तर शिखर धवनला एकच सामन्यात खेळवलं. त्यानंतर बाहेर बसवलं. मात्र वारंवार अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला तिसरी संधी दिली. मात्र पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमार यादवला संघाबाहेर बसवले. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर धवनला बाहेर केल्यानंतर गौतम गंभीर याने टीका केली होती.
आता माजी दिग्गज खेळाडू व्ही.व्ही. एस. लक्ष्मणने देखील तिसऱ्या टी-२० मध्ये प्लेईंग इलेवनबाबत म्हटलं की, तुम्ही अशा प्रकारे संघात कसा बदल करु शकता. एका सामन्यात अयशस्वी झाल्यानंतर धवनला संघाबाहेर केले. मात्र वारंवार अपयशी होणाऱ्या राहुलला पुन्हा संधी का दिली जात आहे. असा प्रश्न व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
- मोठी बातमी : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन
- स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी
- शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना निवडून देणार का? : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
