🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखुन दणदणीत पराभव करत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयानंतर ५ सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी बढत मिळवली आहे. भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचा प्लॉप शो या सामन्यातही सुरुच होता. मात्र कर्णधार कोहलीने लोकेश राहुलची बाजु संभाळून घेत त्याचा बचाव केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. या सामन्यात तो पुन्हा एकदा भोपळाही न फोडता माघारी तंबुत परतला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात राहुल फक्त १ धाव काढुन बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भोपळाही न फोडता माघारी परतला. त्याच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार कोहलीवर त्याला संघाबाहेर करण्यासाठी दबाव येत आहे.
मात्र कर्णधार कोहलीने त्याचा बचाव करत म्हणले आहे की, काही दिवसापुर्वी मी पण खराब कामगिरी करत होते. राहुल हा चांगला खेळाडू आहे आणि मालिकेतील पुढील सामन्यातही तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार आहे. टी-२० सामन्यात एक-दोन फटके चांगले खेळता आले की सर्वकाही पुर्वरत व्हायला वेळ लागत नाही. लोकेश राहुल हा सद्यस्थितीत अंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अतिरेकी संघटनांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त केल्याशिवाय जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही’
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- ‘370 कलम रद्द केल्याने कश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचे नगारे वाजवले गेले, पण तसे खरेच झाले आहे काय?’
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
