🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यात तसेच जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.
देशात कोरोनाचे लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी या विषयावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये 1,054 नवीन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान भारताने लसीकरणात 3.29 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी देशात एका दिवसात सर्वाधिक तीस लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली. केवळ 15 दिवसात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1 कोटीहून अधिक लाभार्थीना लस देण्यात आली
लसीकरण मोहिमेच्या (दि .15 मार्च 2021) 59 व्या दिवसापर्यंत, एकूण 30,39,394 लस मात्रा देण्यात आल्या आहेत . त्यापैकी 26,27,099 लाभार्थीना 42,919 सत्रांमध्ये पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला आणि 4,12,295 एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यूंना लसीचा दुसरा डोस मिळाला. त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
- मोठी बातमी : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन
- स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी
- शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना निवडून देणार का? : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
