Share

‘अतिरेकी संघटनांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त केल्याशिवाय जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या वर्षभरापासून भारतीय सैन्यातील अनेक जवान शहीद झाले आहेत. कधी या राज्यात तर कधी त्या राज्यात शहीद जवानांचे पार्थिव येण्याच्या घटना थांबण्याच नाव घेत नाहीत यामध्ये आता पुन्हा सोमवारी सकाळपासून जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागामध्ये भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात भारतीय फौजांना यश आलं आहे.

शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. ही मोहीम शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू करण्यात आली. याआधी ११ मार्च रोजी देखील जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं होतं. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये हे दोन दहशतवादी सापडले होते. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निष्ण साधण्यात आला आहे. 370 कलम रद्द केल्याने कश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचे नगारे वाजवले गेले, पण तसे खरेच झाले आहे काय? असा सवाल यावेळी करण्यात आला.

‘हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांनी आणखी एक धडाकेबाज ऑपरेशन यशस्वी केले आहे. जम्मू-कश्मीरच्या शोपियां जिह्यात तब्बल तीन दिवस चाललेल्या तुंबळ धुमश्चक्रीत जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेच्या कुख्यात कमांडरला जवानांनी कंठस्नान घातले आहे. विलायत लोन ऊर्फ सज्जाद अफगाणी हा जैशचा मोस्ट वॉण्टेड कमांडर मारला गेला हे सुरक्षा दलांचे मोठेच यश आहे. अफगाणीचा खात्मा करणाऱ्या जांबाज जवानांची आणि या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी. कारण मारला गेलेला अफगाणी हा काही सामान्य अतिरेकी नव्हता. जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेचे तमाम म्होरके लागोपाठ मारले गेल्यानंतर अफगाणीने कश्मीर खोऱ्यात नव्याने जैशचे नेटवर्क उभे केले होते.

कश्मीरातील तरुणांची माथी भडकावून त्यांना अतिरेकी संघटनेत सामील करण्याचा सपाटाच त्याने लावला होता. जैशमध्ये असंख्य तरुणांची भरती करण्याबरोबरच कश्मीरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांतही अफगाणीचा हात होता. सुरक्षा दलांच्या हिटलिस्टवर असलेल्या अफगाणीला ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्यासाठी कश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी शोधमोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. त्यातच शनिवारी शोपियां जिह्यातील रावलपोरा येथे अफगाणी लपून बसल्याची पक्की खबर सुरक्षा दलांना मिळाली. जवानांनी घेराबंदी सुरू करताच एका घरात लपून बसलेल्या अफगाणीने गोळीबार सुरू केला. अनेक तासांच्या चकमकीनंतर जवानांनी स्फोटकांचा वापर करून ते घरच उडवून लावले. यात अफगाणीचा एक साथीदार मारला गेला, पण अफगाणी व अन्य एक अतिरेकी पळून गेले. मात्र, बहाद्दर जवानांनी पाठलाग करून सोमवारी अखेर अफगाणीचा खात्मा केलाच.

मात्र, अतिरेकी संघटनांना सर्व प्रकारची रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त केल्याशिवाय जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही हे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानने सुरू केलेल्या छुप्या युद्धाचे आपण शिकार झालो आणि त्यातच गुरफटून बसलो. 370 कलम रद्द केल्याने कश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया कमी झाल्या असे नगारे वाजवले गेले, पण तसे खरेच झाले आहे काय? जैश-ए-मोहंमदचा कुख्यात कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा आपल्या सुरक्षा दलांनी आता केला हे चांगलेच झाले, पण कश्मीर खोऱ्यात दहशतवादाची पाळेमुळे आज कायम आहेत असाच त्याचा अर्थ आहे. मागच्या तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर या कालावधीत सुरक्षा दलांनी धडाकेबाज मोहिमा राबवून 635 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून कराण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!