🕒 1 min read
बीड : जिल्ह्यात कोरोना वाढत चालला असताना लोकांच्या मनात कोरोना प्रति पुन्हा भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. माजलगाव शहरातील गणपती मंदिर व सोळंके महाविद्यालयात मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणी सुरू असून, यात पॉझिटिव्ह निघालेले अनेक जण कोणालाही न सांगता, मंगळवारी पळून गेलेले असताना आरोग्य विभागाला मात्र याचा पत्ता ही लागला नाही.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, प्रशासनाने व्यापाऱ्यांना अँटिजन चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणीसाठी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. यात अनेक जण पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी गणपती मंदिरात चाचणीनंतर पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण कोणालाही न सांगता फोनवर बोलत-बोलत येथून जाताना त्यांना आरोग्य विभागाचे कर्मचारी व अनेक व्यापाऱ्यांनी पाहिले. मात्र, त्या रुग्णांना कोणी अडविण्याचा प्रयत्न केला नाही. हे पॉझिटिव्ह रुग्ण दुचाकीवरून निघून गेले. निघून गेलेल्या रुग्णांमुळे इतर नागरिकांना बाधा होण्याची शक्यता आहे.
मागील तीन दिवसांत १,६८० व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. यात ८७ व्यापारी पॉझिटिव्ह आले होते. बुधवारी व्यापाऱ्यांच्या अँटिजन चाचणीचा शेवटचा दिवस असल्याने आणखीन किती व्यापारी पॉजिटीव्ह येतील हे वेळ सांगेल.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
- मोठी बातमी : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन
- स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी
- शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना निवडून देणार का? : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
